आपल्या सांगलीचा बदल, आपल्या डोळ्यांसमोर
आपली सांगली… शांत, मेहनती आणि दिलदार मनाची! या जिल्ह्यात रोज काहीतरी चांगलं घडत आहे. कधी नवीन प्रकल्पातून, कधी एखाद्या छोट्या पण दूरदृष्टी ठेऊन घेतलेल्या निर्णयातून, तर कधी एखाद्या अधिकाऱ्यानी मनापासून केलेल्या प्रयत्नातून.
विकासवाटेवरील या सर्व सकारात्मक गोष्टी ‘सांगली विशेष’ मधून आपल्यासमोर ठेवत आहोत. कारण आपला जिल्हा बदलत असताना… तो बदल पहायला, समजून घ्यायला आणि त्याचा अभिमान बाळगायला आपण सगळेच पात्र आहोत.
सांगली जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात सांगलीमध्ये अनेक संधी, अनेक सुधारणा आणि अनेक छोट्या-मोठ्या बदलांची नवी वाट तयार होत आहे.
पाण्याचे प्रकल्प असोत, आरोग्य सेवांमधील सुधारणा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर किंवा शाळांमध्ये सुरू झालेली प्रगतीची पावले… हे सर्व उपक्रम केवळ कागदावरील योजना नसून नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारे, त्यांना दिलासा आणि विश्वास देणारे प्रयत्न आहेत.
विकासाचे हे प्रगतीपुस्तक पहातांना आपल्याला सुद्धा हे जाणवेल— “हो… आपली सांगली खरंच बदलते आहे आणि त्या बदलात नक्कीच माझाही सहभाग आहे.”
